शिरीष बेरी यांच्या आर्किटेक्चर, चित्रकला, कविता, छायाचित्रण, शैक्षणिक, तत्त्वज्ञान आणि पर्यावरणशास्त्र यातील विविध अभिव्यक्तींद्वारे केलेला जीवनाच्या समग्रतेचा शोध आपल्यासमोर मांडण्याच्या तीव्र इच्छेमुळे हा चित्रपट घडला.
हा एक जीवनातील प्रश्नावर आधारित चित्रपट आहे (व्यक्तिमत्त्वावर आधारित नाही) जो आपले कार्य आणि जीवनातील समग्रता आणि समृद्धता यांच्यातील महत्त्वाचा संबंध शोधण्याचा प्रयत्न करतो. जो विचारते की आपण आपल्या कार्याद्वारे जीवनातील या प्रश्नांना भिडू शकतो का जसे कि –
आपली रचना माणसाला निसर्गाच्या जवळ आणण्यासाठी, माणसा माणसाला जवळ आणण्यास मदत करू शकते का?
आपले आर्किटेक्चर आपल्या जीवनाचा दर्जा सुधारु शकेल का ?
संवादाचे एक शक्तिशाली माध्यम म्हणून चित्रपटाने शिरीषना नेहमीच भुरळ घातली – आणि शेवटी त्यांना इतर चित्रपट व्यावसायिकांच्या मदतीने हा चित्रपट बनवण्यास प्रवृत्त केले.
युरोपमधील एकोटॉप चित्रपट महोत्सवात १२ मिनिटांच्या आवृत्तीने २०० हून अधिक जगभरातील चित्रपटांमधून आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कार जिंकला.